Share

सदाभाऊ भाजपच्या चिन्हावर लढणार, पुत्र सागर खोत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे इस्लामपुरमधून भाजपच्या चिन्हावर लढणार अशी चर्चा होती. आणि आता भाजप युवा मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी सदाभाऊ यांचे पुत्र सागर खोत यांची निवड झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत आता कमळाच्या चिन्हावरच लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भाजप युवा मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी यापूर्वी गोपीचंद पडळकर हे होते. परंतु पडळकर यांनी वंचित मध्ये प्रवेश केल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे आता या पदावर सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांची निवड झाली. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी ही नियुक्ती केली आहे. या पदासाठी सागर यांच्या नावाची कसलीही चर्चा नव्हती तरीही त्यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, सदाभाऊ खोत हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात लढणार आहेत. आता सागर यांची युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे ते भाजपच्याच चिन्हावर लढणार याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!