Share

chandrashekhar bawankule on vinayak mete | कालच आमचं बोलणं झालं, निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नाही- चंद्रशेखर बावनकुळे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. तसेच सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर विनायक मेटेंच्या निधनावर आता राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केले आहे.

“विनायक मेटे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची लढाई लढत होते. त्यांनी सातत्याने त्यांचं काम सुरु ठेवलं. मराठा आरक्षणासाठी त्यांनी स्वतःच पूर्ण आयुष्य पणाला लावलं. विनायक मेटेंच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. कालच मला त्यांचा फोन आला होता. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या. भाजप आणि शिवसंग्राम नेहमीच सोबत राहतील, असा विश्वास त्यांनी मला दिला होता. कालच आमचं बोलणं झालं आणि आज त्यांच्या अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली, खरंच यावर विश्वासच बसत नाहीये.”, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.

मदत मिळालीच नाही

मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हेदेखील त्यांच्यासोबत होते. त्यांनी या अपघाताबद्दल बोलताना सांगितलं, की एका ट्रकने कट मारल्याने बीडकडून मुंबईकडे येताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला. अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. यानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. मदतीसाठी अनेकदा कदम विनवणी करत होते. मात्र, कोणीही गाडी थांबवली नाही, अशी माहिती कदम यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!