मुंबई : केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या निर्यातीवर जी बंदी घातली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
आधीच शेतकरी कोरोनाच्या संकटात सापडलेला असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकू नये. तसेच कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी. अशी मागणी राज्याचे माजी राज्य कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आत्महत्या वाढत आहे. त्यात कांदा निर्यात बंदी निर्णयानं कांद्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्राने ताबडतोब हा निर्णय रद्द केला पाहिजे. केंद्र सरकारनं जे वचन शेतकऱ्यांना दिलं होतं त्याला तडा गेल्याची शंका उपस्थित होते शेतकऱ्यांच्या निर्णयाची फक्त घोषणाबाजी केली का? असा सवाल करत केंद्राने हा निर्णय बदलावा अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही. राज्य सरकारनेही याबाबत केंद्राला पत्र लिहून निर्णय मागे घेण्यास सांगावे असंही रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1472373129639191/
महत्वाच्या बातम्या :
- शेतकरी हिताचा निर्णय घ्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात
- ‘कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटशूळ उठला’
- …अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, सदाभाऊ खोतांचा केंद्राला इशारा
- ‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’
- पंतप्रधान कांद्याचे वांदे करत आहेत – छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

