नवी दिल्ली- भारत आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षांपासून लडाखवरुन वाद सुरु आहे आणि तो आता आणखी चिघळला आहे. भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. या झडप भारताचे तीन सैनिक शहीद झाले असून त्यात एक अधिकारी आणि दोन जवानांचा समावेश आहे. या झटापटीत चीनचे काही जवान ठार झाल्याचंही म्हटलं जात आहे.
भारत आणि चीन यांच्यातील तडाखच्या सीमेवरील सुरू असलेले वाद कमी होण्याचं नाव घेत नाही. दिवसेंदिवस तिथे अधिक तणावाचं वातावरण होत आहे. सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी झालेल्या वादातून भारताचे 3 जवान शहीद झाले.
दोन्ही देशांमधील सैन्यात तुफान दगडफेक आणि मारहाण झाल्यानं तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकारी यासंबंधी घटनास्थळी बैठक घेत असल्याची माहितीही लष्कराने दिलीये. भारतीय सैनिकांकडून सीमा ओलांडून चीनी सैनिकांवर हल्ला केला, अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेकडून देण्यात आलं आहे.
India stands with the 3 brave martyrs who were killed by China today in #Galwan. My thoughts are with families of Colonel & 2 brave soldiers. The commanding officer was leading from the front. The government must avenge these killings & ensure that their sacrifice was not in vain
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 16, 2020
दरम्यान, लडाखच्या गलवानमध्ये चीनबरोबरच्या चकमकीत शहीद झालेल्या ३ योद्ध्यांबरोबर भारत उभा आहे. एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये, या हत्येचा सूड घेतला जावा, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ मातब्बर कॉंग्रेस नेत्याच्याही मनात येत होते सुशांत सारखेच विचार
इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा पाकिस्तानने केला अमानुष छळ
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा…

