Share

इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा पाकिस्तानने केला अमानुष छळ

Published On: 

नवी दिल्ली – पाकिस्तानमधून दोन भारतीय उच्चायुक्त गायब झाल्याने खळबळ उडाली होती. पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद येथे कार्यरत असलेले भारतीय उच्चायुक्तालयातील दोन अधिकारी अचानक गायब झाले होते.

भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दोन गुप्तहेरांना भारतीय तपास यंत्रणांनी अटक केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफचे दोन वाहन चालक ड्युटीसाठी बाहेर गेले होते. मात्र, ते दोघेही इच्छित ठिकाणी पोहचले नाहीत. या वाहन चालकांचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

आता हे दोन्ही अधिकारी समोर आले असून पाकिस्तानचा खरा चेहरा देखील समोर आला आहे. या दोन्ही वाहन चालकांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या वाहन चालकांना तब्बल १२ तास कसून चौकशी केली व त्यांचा प्रचंड छळ केला. या कर्मचाऱ्यांना उच्चायुक्त कार्यालयाजवळील पेट्रोल पंपावरुन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिली. भारतीय दूतावासातील या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या डोळयावर पट्टी बांधण्यात आली होती व त्यांना बेडया घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दहा मिनिटात एका अज्ञातस्थळी नेण्यात आले. त्यांची तिथे सहा तास चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना रॉडने आणि लाकडी काठीने मारहाण करण्यात आली, तसेच अत्यंत घाणेरडे पाणी प्यायला लावले. पाकिस्तानने त्यांच्यावर उच्चायुक्त कार्यालयातील प्रत्येक अधिकाऱ्याची काय भूमिका आहे? तो कसा काम करतो याची माहिती देण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

शेवटी बहिणीची माया : भाऊ काळजी घे, पंकजा मुंडेंनी केला धनंजय मुंडेंना फोन

पालखीची परंपरा मोडणार नाही, पण शासनाने सुचवलेल्या पद्धतीनेचं सोहळा पार पडणार

सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांना मूठमाती देऊन कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र लढावे – अमित शहा

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!