Share

रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा…

Published On: 

नागपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांची शाळा घेतली. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे अवस्था पाहून मुंढे यांना संताप आल्यानं त्यांनी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली.

‘महापालिकेचे काही डॉक्टर नीट प्रॅक्टिस करत नाही, ज्यांना जमत नसेल त्यांनी घरी जावं’ अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी वॉर रुममध्येच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झापलं. तसेच लॉकडाउनचं पालन योग्यरित्या होत नसल्यानं प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. नागरिकांनी लॉकडाउनच्या निर्णयाचं पालन न केल्यास गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागेल. असा इशाराही मुंढे यांनी दिला होता.

दरम्यान, करोनाविरूद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागानं सज्ज राहावं, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसंच प्रशासनातली गोपनीय माहिती बाहेर पडत असल्याबाबत मुंढे यांनी नाराजीही व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी तुकाराम मुढे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांनी लॉकडाउनच्या निर्णयाचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं होतं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!