Share

लोकांना रस्त्यावर बोलवून बीजेपी मरकज २.० घडवू इच्छित आहे का? ; फडणवीसांच्या आवाहनावर टीका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले.

यासोबतच, आज ५ एप्रिलला, जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावं म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली आहे. ती म्हणजे, आज रविवार ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं होतं ज्यात ते लोकांना यात रस्त्यावर येऊन सहभागी व्हावं असं म्हणाले . आता महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यावर टीका केली आहे. ते ट्वीटर वर म्हणाले,

लोकांना रस्त्यावर येण्यास सांगत विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या बेजबाबदार विधानाचा जोरदार निषेध. यापूर्वी मोदीजींनी थाली बाजो यांना बोलाविल्यामुळे अनेक बीजेपी अनुयायी रस्त्यावर आले आणि त्यांनी सामाजिक अंतराची थट्टा केली. बीजेपी मरकज २.० बनवू इच्छित आहे का?  भाजपकडून बिनशर्त माफीची मागणी करतो  .

हेही पहा –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!