नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७५ वा दिवस आहे. शेतकरी आंदोलनाची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात येत असून पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. मात्र या दोन्ही सेलिब्रिटींनी मांडलेल्या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी ‘भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करू नये’ अशी एकमुखी भूमिका मांडली.
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील अशीच भूमिका मांडली होती. मात्र यानंतर सचिनला सोशल मीडियावर मोठा विरोध करण्यात येतोय. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे खासदार जसबीर एस. गिल यांनी केले आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार आणि अन्य सेलिब्रेटिंवर गिल यांनी जोरदार टीका केली.
शेतकरी आंदोलनाविरोधात ज्यांनी वक्तव्ये केली, त्यांचा आत्मसन्मान संपलेला आहे. त्यांची लायकी नाही. सचिन तेंडुलकरने केवळ आपल्या मुलाला इंडियन प्रिमीयर लीगमध्ये स्थान मिळावे, यासाठी सरकारची बाजू घेतली. जनतेने याचा निर्णय घ्यावा. भारतरत्नसाठी सचिन तेंडुलकर पात्र नाही, असे गिल यांनी म्हटले आहे.
Akshay Kumar's IQ is such that he asks PM if he eats mangoes… getting him to tweet shows govt is afraid. People who spoke against farmers don't have conscience. Sachin Tendulkar toed govt's line to get his son into IPL. He doesn't deserve Bharat Ratna: Congress MP Jasbir S Gill pic.twitter.com/QrvYrhIxcd
— ANI (@ANI) February 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांच्या ‘अशा’ विधानांना मी गांभीर्याने घेत नाही – जयंत पाटील
- फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल केलीये; समाजाने EWSच आरक्षण स्वीकारावं – संभाजी ब्रिगेड
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात’
- ‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं !’


