Share

‘NCB व भाजपमधील संगनमताची मविआ सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना एनसीबीने अटक केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या क्रूझवर जाऊन तपासणी सुरु करत ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत.

आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी आणि अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी हे भाजपशी संबंधित असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी फोटोसह अधिकाऱ्यांचा भाजपशी संबंध असल्याचे दाखवले आहे. अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी मनीष मर्चंट हा एनसीबीचा अधिकारी नसून भाजपचा नेता असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. भानूशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे फोटो देखील नवाब मलिक यांनी दाखवले आहेत.

नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री यांनी एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर केलेले वक्तव्ये आणि खुलाशामुळे आता ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. दरम्यान, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील एनसीबी आणि भाजपा यांच्यातील संगनमतावर आक्षेप घेतला आहे.

सावंत म्हणाले, NCB व भाजपमधील संगनमताची मविआ सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे? कोणत्या अधिकाराने? भाजपचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात? यांच्या गाडीवर पोलीस पाटी कशी? NCB ने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का?

मुंद्रा पोर्ट ड्रगसाठा प्रकरणातून लक्ष हटवणे हे लक्ष्य होते का? गोव्यात, सँडलवूड ड्रग रॅकेट व सुशांत सिंह प्रकरणात भाजपचे ड्रग कनेक्शन पाहिले आहे. देशाविरुद्ध हे गंभीर षडयंत्र आहे. तरुण पिढीला उध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे. नवाब मलिक यांचे आरोप गंभीर आहेत, चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!