मुंबई: विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सोबत अर्ध्यावर सोडून सचिन अहीर यांनी शिवसेनेची वाट पकडली. अहिरांच्या खांद्यावर शिवसेनेने पक्षाची मोठीजबाबदारी दिली आहे. सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अहिर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम करताल असा मला विश्वास आहे.’ असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. तसेच सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला रिट्वीट करत ‘पाठिंबा आणि विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद’ असं म्हणत आदित्य ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
राष्ट्रवादीचं मुंबई अध्यक्षपद भूषवत असताना सचिन अहिर यांनी पक्षाला मोठा धक्का दिला होता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 25 जुलै 2019 रोजी सचिन अहिरांनी शिवबंधन हाती बांधलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

