नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे २०३६ पर्यंत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पुतीन यांना राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी संविधानात केलेल्या बदलांना रशियातील मतदारांनी मान्यता दिली आहे.
दरम्यान, आठवडाभर सुरू असलेली जनमत चाचणी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्यामुळे पुढील १६ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहण्याचा पुतीन यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पुतीन आणखी 16 वर्षे म्हणजेच 2036 पर्यंत सत्तेवर राहू शकतात. याबाबत रशियन राज्यघटनेत करण्यात आलेल्या बदलाला तिथल्या नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
व्लादिमीर पुतीन यांचा कार्यकाळ 2024 साली संपणार होता. त्यांना या पदावर आणखी दोन टर्म राहता यावं यासाठी रशियन राज्यघटनेतील अटींमध्ये बदल करण्यात आला होता.दरम्यान, संविधान दुरूस्ती कायद्याद्वारे पुतिन यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना सहा वर्षांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे.
‘सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करणं कठीण, सरकारवर येऊ शकते कर्ज काढण्याची वेळ’ – मंत्री विजय वडेट्टीवार
कोरोना व्हायरस महामारीमुळे गर्दी कमी ठेवण्यासाठी प्रथमच रशियात मतदान प्रक्रिया एक आठवडा चालली आहे. संविधानात करण्यात आलेल्या दुरूस्तीसाठी जनतेला विश्वासात घेण्यासाठी पुतिन यांनी मोठ्या स्तरावर अभियान राबवले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
