पुणे : राज्यात कोरोना थैमान घातले आहे. महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आता याचा परिणाम म्हणून शासनाच्या महसूलात घट झाल्याने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देणेही सध्या शासनाला अवघड बनले आहे. अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, कोरोनामुळं शासनाच्या महसूलात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुढील महिन्यात कर्ज काढावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मदत व पुनवर्सन, आरोग्य आणि इतर दोन विभाग वगळता इतर विभागात वेतन कपात करण्याची वेळ आली आहे. मात्र, डॉक्टर, नर्स आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या कोरोना योद्ध्यांचे पगार दिले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी राज्यातील भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले ‘कोरोना विषाणूमुळे राज्यातील उद्योग व्यवसाय चालणे कठीण झाले आहे. यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील एकही पैसा अद्याप राज्याला मिळालेला नाही. त्यामुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीत केंद्राने राज्याला लवकरात लवकर मदत देणं अपेक्षित आहे. मात्र, असं होताना दिसत नाही. उलट सरकारवर काहीजण टीका करण्याचे काम करीत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याचे आवाहन करण्याऐवजी ज्या विरोधकांनी राज्यातील नेत्यांना, व्यवसायिकांना आणि नागरिकांना पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन केले, अशा महाराष्ट्रद्रोहींना राज्य शासनाच्या कारभारावर बोलण्याचा अधिकार नाही’.
महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढला,या गोष्टीवर असणार निर्बंध
मोठी बातमी : कोरोना टेस्ट साठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही
वीज बिले आहेत कि खंडण्या ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यात आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
