Share

आनंदाची बातमी : कोरोनावर लस आली, ‘या’ देशाने केला दावा

Published On: 

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान आतापर्यंत जगातील लाखो नागरिकांचा बळी घेतला आहे. संपूर्ण या घातक विषाणू समोर गुडघे टेकले असताना रशिया मधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रशियाने या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी एक प्रभावी लस विकसित केली आहे. ही नवी लस लवकरच रुग्णांच्या उपाचारासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती रशियाच्या आरोग्य यंत्रणेने दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे रशिया सकरकार ही लस वापरण्यास मंजुरी दिली आहे. रशियाने विकसित केलेल्या या लसीला ‘एव्हिफेव्हीर’ असं नाव देण्यात आलं आहे

११ जूनपासून रशियन रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर या अँटीव्हायरल लसीने उपचार सुरु होणार आहेत. ही लस विकसित करणारी कंपनी दर महिन्याला तब्बल ६० हजार रूग्णांवर उपचार करेल अशाप्रमाणात लसीचं उत्पादन करणार आहे. ‘एव्हिफेव्हीर’ हे औषध फॅव्हीपीरावीर म्हणून ओळखले जाते. एका जापानी कंपनीने या लसीची निर्मिती यापूर्वी केली होती. जपानमध्ये ही लस ताप, सर्दी झालेल्या रुग्णांना देण्यात येते. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एव्हिगन या ब्रॅण्डनेमअंतर्गत फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते.

मला विश्वास आहे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल – नरेंद्र मोदी

‘एव्हिफेव्हीर’ लसीवर काही प्रक्रिया करून शिवाय त्यामधील रोगप्रतिकाशक्ती वाढवण्याचा प्रयत्न रशियन शास्त्रज्ञांनी केले आहे. रशियाकडून विकसित करण्यात आलेल्या लसीची माहिती काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात यईल असं वक्तव्य आरडीआयएफच्या प्रमुखांनी केलं आहे. शिवाय त्यांनी अवघ्या चार दिवसांत रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्रातल्या तीनही पक्षांचा एकमेकांवर विश्वास आहे तोपर्यंतच सरकार टिकणार – अमित शहा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!