Share

मला विश्वास आहे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल – नरेंद्र मोदी

Published On: 

नवी दिल्ली : भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, संकट व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भारत निश्चित विकासाच्या मार्गावर परतेल” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते सीआयआयला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमा उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना व्हायरस या संघर्षाच्या स्थितीत ऑनलाइन कार्यक्रम नॉर्मल झाला आहे. मात्र हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचं आहे. पण त्याचसोबत अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचं आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मला देशाच्या क्षमतेवर, प्रतिभेवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे, म्हणूनच विश्वास आहे की, आम्ही पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला वेगवान गती देऊ. कोरोनाने भलेही अर्थव्यवस्थेचा वेग कमी केला असेल परंतु लॉकडाऊन मागे सोडून भारताने अनलॉक १ च्या टप्प्यात प्रवेश केला आहे असं ते म्हणाले.

चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची भीती, किनारपट्टीवर सावधगिरीचा इशारा

तसेच जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरु होतं. त्यावेळी भारताने मोठे निर्णय घेतले, वेळीच लॉकडाऊन लागू केले. या काळात आपल्या सुविधांमध्ये वाढ केली. त्यामुळेच जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्थिती बऱ्यापैकी चांगली होती. अर्थव्यवस्थेला मजबूत करणे सरकारचं प्राधान्य आहे. यासाठी केंद्र सरकार विविध निर्णय घेत आहे. यामध्ये तातडीच्या निर्णयासोबतच दीर्घकालीन फायदा देणाऱ्या निर्णयांचाही समावेश आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत ७४ कोटी लोकांना रेशन दिलं. स्थलांतरित मजुरांना मोफत अन्नधान्य दिलं. आतापर्यंत गरीब कुटुंबाच्या खात्यावर ५३ हजार कोटी रुपये टाकले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तज्ज्ञ डॉक्टरचा मुंबईत कोरोनाने मृत्यू, तब्बल 10 तास नाही मिळाला बेड

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!