टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारच्या आरसीईपी कायद्याच्या देशव्यापी करारातून दुग्धजन्य पदार्थ व शेतीमाल वगळण्यात यावे. शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यात यावा. शेतीमालाला दिडपट हमीभाव मिळावा. महापोर्टल परीक्षा रद्द करण्यात यावे. इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आज ( ८ जानेवारी ) ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. त्या निमित्त माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या अंकली टोल नाका येथे रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.
उद्धव ठाकरे सरकारकडून 2 लाखांचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, प्रत्यक्षात मात्र अनुदानित पिककर्जाची मर्यादा ही 3 लाख रूपये आहे. 3 लाख रूपये पिककर्ज आणि त्यावरील व्याज तसेच इतर शेतीपूरक कर्ज देखील सरकारकडून माफ करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तसेच संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं, ते देखील पाळण्यात न आल्याने राज्य सरकारच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज आहेत, म्हणून त्या नाराजीचा भाग म्हणून 8 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे, असं राजू शेट्टी यांनी यापूर्वीच म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

