Share

“साहेब लवकर बरे व्हा, पाच दशके पराजयाच्या छाताडावर नाचत”

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President Sharad Pawar Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवारांनी स्वतः ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचे आणि चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले आहे. कोरोनाचे सौम्य लक्षणे असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे. शरद पवार कोरोनातून लवकर बरे व्हावेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी ट्विट करत प्रार्थना केली आहे.

 

रुपाली पाटील ठोंबरे ट्विट करत म्हणाल्या, ‘संघर्षयोद्धा : साहेब लवकर बरे व्हा… पाच दशके पराजयाच्या छाताडावर नाचत; बहुजनांच्या संघर्षचा “अपराजित योद्धा” म्हणजे साहेब ! आपण या संकटाला हरवून आमच्या मार्गदर्शनासाठी व महाराष्ट्रहितासाठी लवकर सक्रिय व्हाल हि सदिच्छा..’, असे ट्विट रुपाली पाटील यांनी केले आहे.

शरद पवार यांनी कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती ट्विट करत दिली होती. शरद पवार ट्विटमध्ये म्हणाले होते, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की, त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे ट्वीट शरद पवारांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!