🕒 1 min read
मुंबई : गेल्या ११ महिन्यांपासून ईडीच्या कोठडीमध्ये असलेल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अखेर मंजूर झाला आहे. कथीत 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. देशमुखांच्या जामीनवर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली ठोंबरे यांची प्रतिक्रियाः
रुपाली ठोंबरे यांनी अनिल देशमुखांचा एक फोटो शेअर केला आहे. दसऱ्याच्या आदी सत्याचा विजय, असं या फोटोवर लिहिण्यात आलं आहे. सत्यमेव जयते ! असं म्हणत जेलात गेलो पण भाजपात गेलो नाही, थोरल्या पवार साहेबांचा मरेन पण मागे न हटणारा, मरहट्टा आज जिंकला, निष्ठावान देशमुख जामीन मंजूर गद्दार पिचडाचा राजकीय अंत, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
रुपाली ठोंबरे यांचं ट्विटः
सत्यमेव जयते !
जेलात गेलो पण भाजपात गेलो नाही …
थोरल्या पवार साहेबांचा मरेन पण मागे न हटणारा
मरहट्टा आज जिंकला …निष्ठावान देशमुख जामीन मंजूर
गद्दार पिचडाचा राजकीय अंत @AnilDeshmukhNCP @PawarSpeaks pic.twitter.com/Is5xpwCBue— Rupali patil thombare (@Rupalispeak) October 4, 2022
महेश तापसे यांची प्रतिक्रिया :
अनिल देशमुखांचा जामीन होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तापसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. हा सत्याचा विजय झाला असल्याचं तापसे यांनी म्हटलं आहे. आज अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर झाला, आम्ही सुरुवातीपासून हेच म्हणत होतो की अनिल देशमुख यांच्यावरच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे आरोप केवळ राजकीय आरोप असून अखेर आज न्यायदेवतेने न्याय करत अनिल देशमुख यांना जामीन दिला आहे, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, असं देखील महेश तापसे म्हणाले आहेत.
गेल्या 11 महिन्यांपासून अनिल देशमुख यांना त्रास देण्यात येत होता, यात पूर्णपणे भाजपचा (BJP) हात असून ज्यांनी आरोप केले त्यांच्याकडे कोणतेच पुरावे सादर करायला नव्हते त्यामुळे आज अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे, या प्रकरणातून त्यांची निर्दोष पणे लवकरच मुक्तता होईल, असं देखील तापसे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP। प्रादेशिक पप्पू होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात, आमच्या शुभेच्छा; भाजपाचा पटोलेंवर हल्लाबोल
- Kishori Pednekar | “कोणी एैरा-गैरा नट्टू खैरा…”; मनसेच्या ‘त्या’ पोस्टवर किशोरी पेडणेकर भडकल्या
- Viral Video | लहान मुलाला सिंहासोबत खेळताना बघून व्हाल थक्क! पाहा व्हिडिओ
- NCP | “गेल्या ११ महिन्यांपासून…” ; अनिल देशमुखांचा जामीन मंजूर होताच राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
- Cabinet meeting । शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातील ७ कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट पॅकेज जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
