पुणे : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र, याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.
या निकालानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. ‘छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला,’ असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.
आता पाटलांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला,’ अशी खोचक टीका चाकणकर यांनी केली आहे.
चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर पुर परिस्थितीत आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे ,आपल्याला आपला मतदार संघ सोडून आमच्या पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदार संघ निवडावा लागला……सुज्ञास फार न सांगावे लागे!! जलयुक्त शिवार , चिक्की घोटाळा , मुंबई बँक घोटाळा ते PWD1/2 pic.twitter.com/oEbMSK41TC
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 3, 2021
चाकणकर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून पाटलांवर घणाघात केला आहे. ‘चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणघेणं नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा M.Phil करत आहेत. छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, चंद्रकांतदादांनी आपल्या आजुबाजूला पाहिले तर भाजपमधील अनेक नेतेही जामिनावरच बाहेर आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये,’ असं चाकणकर म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- खासदार नवनीत राणा यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे रेमडेसिवीरची मागणी
- भाजपचा पराभव दिसणाऱ्यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे
- मोठी बातमी : आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, आज होणारा कोलकाता विरुद्ध बँगलोर सामना रद्ध
- मराठवाडयात निवडणूक बूथनिहाय लसीकरण केंद्र उभारण्याची आपची मागणी
- मोठी बातमी! आज होणारा आरसीबी विरुद्ध केकेआर संघाचा सामना पुढे ढकलला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

