Share

पश्चिम बंगालची निवडणूक रिपाइं लढवणार; शिवसेनेची भूमिका मात्र गुलदस्त्यात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी लागले असून रिपब्लिकन पक्ष ही 10 जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

पश्चिम बंगाल रिपाइं चा मेळावा कोलकाता येथे घेण्यात आला यावेळी रामदास आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी रिपाइं चे पश्चिम बंगालचे प्रदेश अध्यक्ष मृत्युंजय मलिक उपस्थित होते. पश्चिम बंगाल च्या आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांच्या तृणमूल काँग्रेस चे पानिपत होणार असून एनडीए चा प्रचंड मोठा विजय होईल असे ते म्हणाले.

पश्चिम बंगाल मध्ये भाजप प्रणित एनडीए आघाडी ला आरपीआय चे समार्थन राहील.भाजप सोबत आरपीआय ची युती राहणार असून पश्चिम बंगाल मध्ये भाजप आरपीआय एनडीए चा मोठा विजय होईल तर तृणमूल काँग्रेस चा दारुण पराभव होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

भाजप एनडीए ला पश्चिम बंगाल मध्ये जन समर्थन वाढत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पश्चिम बंगाल मध्ये सत्ता परिवर्तन होणार असल्याचा दृढ विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. लवकरच पश्चिम बंगाल चे भाजपच्या प्रदेश अध्यक्षांशी आरपीआय भाजप निवडणूक युती आणि जागावाटप  बाबत चर्चा होणार  असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

दरम्यान,राष्ट्रीय राजकारणात आपले वजन वाढविण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. मात्र त्यांना म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही. शिवसेनेने नुकतीच बिहारमध्ये देखील निवडणूक लढविली होती मात्र निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही. आता बंगालमधील निवडणूक शिवसेना लढविणार कि नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अद्याप पक्षाने कोणतीही घोषणा केलेली नसल्याने त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!