दुबई- आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी सर्वच संघ आता जोर लावताना दिसत आहेत. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएल2020 मध्ये गुणतालिकेत 14 गुण मिळवून प्ले ऑफ मधील आपलं स्थान जवळपास नक्की केलं आहे. परंतु कर्णधार रोहित शर्मा ची दुखापत ही मुंबईसाठी चिंतेची बाब आहे. मागील दोन्ही सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. मुंबई इंडिअन्सने सोमवारी रोहित शर्माच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले.
सोमवारी रात्री मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर रोहित नेटमध्ये सराव करत असल्याचे फोटो टाकले आहेत. ज्यात त्यांनी, ‘आजच्या सराव सत्रात हिटमॅन पुन्हा ॲक्शनमध्ये. आम्हाला त्याला अशा स्थितीत पाहायला आवडतं’ असं म्हटलं आहे.
Just what we love to see! Hitman in action at today’s training ????#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/FBYIyhtcOW
— Mumbai Indians (@mipaltan) October 26, 2020
मुंबई इंडियन्सकडून असं ट्विट करण्यात आलं असले, तरीही तो दुखापतीतून सावरला आहे की नाही याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, त्यांच्या या ट्विटवरुन तो दुखापतीतून बरा झाला असून त्यामुळेच आता सरावासाठी उतरला असल्याचा कयास लावला जात आहे.
विशेष म्हणजे सोमवारी बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघात रोहित शर्माला वगळण्यात आले. बीसीसीआयच्या निवेदनात रोहित शर्माच्या दुखापतीकडे लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले. मात्र रोहित शर्माला काय झाले आहे, याबाबत काही माहिती दिली नाही.
महत्वाच्या बातम्या
- दसरा मेळाव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
- आमच्यावर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी स्वतःचा वकील लावावा – अशोक चव्हाण
- एलआयसीची प्रारंभिक भाग विक्री पुढील आर्थिक वर्षात
- ‘माझी प्रकृती उत्तम आहे,थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’
- पुणेकरांसाठी खुशखबर ! १ नोव्हेंबरपासून खुली होणार शहरातील उद्याने !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

