Share

रोहित पवार शेंबडे ! माझ्या आजोबांच्या पत्रावर बोलू नका म्हणून कीर-कीर करतायत : निलेश राणे

Published On: 

मुंबई : सतत खरमरीत शब्दात ट्विटवरून राज्य सरकार आणि शिवसेनेला लक्ष्य करणारे माजी खा. निलेश राणे यांनी आपला मोर्चा आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. रोहित पवार यांच्याकडे वळवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्राचा हवाला देत साखर कारखान्यांचे ऑडीट करा, असे ट्विट निलेश राणे यांनी केले होते. यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. यावरून या ट्विटर वॉरला सुरवात झाली.

#महाराष्ट्र_बचाओ : राज्य सरकारला जाग येण्यासाठी ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ भाजपने दिला नारा !

आता निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत रोहित पवार यांना लक्ष्य केले आहे. गल्लीतलं शेंबडं पोर लहान लहान गोष्टीसाठी कसं किर किर करत अस्त तसं एक शेंबडं माझ्या आजोबांच्या पत्रावर कोणी बोलू नका म्हणून किर किर करतंय… ह्या वांग्याची लायकी काय आमच्या नेत्यांवर बोलायची? कोपर्डीची घटना, मराठा क्रांती मोर्चे झाले पण हा लुक्का तेव्हा काही बोलाल नाही, असे ट्विट करत निलेश राणे यांनी रोहीत पवारांवर निशाणा साधला.

रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यात सतत शाब्दिक चकमक सुरु आहे. निलेश राणेंच्या साखर कारखान्यांचे ऑडीट करा या ट्विटला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले होते. यावरून या दोघांमध्ये चांगलीच जुंपली. आता हे ट्विटरवॉर थांबण्याचे काही नाव घेईना. साखर कारखान्यांचे ऑडीट करा यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘पवार साहेबांनी साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांच्या दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठविले आहे. यावर निलेश राणेंनी ‘मी साखरेवर बोललो. पवार साहेबांवर नाही. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? असा सवाल केला.

महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णतः अपयशी : आ. सुभाष देशमुखांची टीका

त्यांनतर रोहित पवार यांनी पुन्हा उत्तर देत निलेश राणेंना लक्ष्य केले. ते म्हणाले की, आपले विचार,आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो.

‘रेल्वे उपलब्ध असूनही राज्यशासनाकडून योग्य पाऊले न उचलल्याने मजूर पायी निघाले’

मात्र निलेश राणे यावरही गप्प बसले नाही. त्यांनी पुन्हा रोहित पवारांना आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले की, बोलणाऱ्याची लायकी बघून मी उत्तर देतो धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझं काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला, असा इशारा दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!