मुंबई : गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर स्पर्धेतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात सनरायझर्स हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची आयपीएल २०२२ची उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड झाली आहे. उमरानने या स्पर्धेत सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. उमरानने या मोसमात १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर राहिला. उमरानचा संघ हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरला जवळपास ६ पुरस्कार मिळाले, त्याने या स्पर्धेत सर्वाधिक ८६३ धावा केल्या. बटलरसाठी हा मोसम स्वप्नासारखा राहिला आहे. या अनुभवी फलंदाजाच्या शानदार फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सचा संघ तब्बल १४ वर्षांनंतर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला. मात्र, अंतिम फेरीत राजस्थानचा गुजरात टायटन्सविरुद्ध ७ विकेट्सने पराभव झाला. गुजरातने पदार्पणाच्या मोसमात ट्रॉफी जिंकून इतिहास रचला.
.@josbuttler dazzled with the bat & slammed 8⃣6⃣3⃣ runs to bag the @aramco Orange Cap.???? ????@yuzi_chahal scalped 2⃣7⃣ wickets to top the bowling charts to bag the @aramco Purple Cap. ???? ????
Congratulations to the two for powering @rajasthanroyals to the #TATAIPL 2022 Final. ???????? pic.twitter.com/jZP66cDx5b
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
आयपीएल २०२२मध्ये खेळाडूंना मिळालेले पुरस्कार –
- हंगामातील उदयोन्मुख खेळाडू : उमरान मलिक (१० लाख)
- मोसमातील सर्वाधिक षटकार : जोस बटलर (१० लाख)
- सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन : दिनेश कार्तिक (१० लाख, टाटा पंच)
- गेम चेंजर पुरस्कार: जोस बटलर (१० लाख)
- फेअर प्ले अवॉर्ड : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स
- पॉवर प्लेअर ऑफ द सीझन : जोस बटलर (१० लाख)
- हंगामातील सर्वात वेगवान चेंडू : लॉकी फर्ग्युसन (१५७.३ KPH)
- मोसमातील सर्वाधिक चौकार : जोस बटलर (१० लाख)
- पर्पल कॅप : युझवेंद्र चहल (२७ विकेट, १० लाख)
- ऑरेंज कॅप : जोस बटलर (८६३ धावा, १० लाख)
- सर्वोत्तम कॅच : एविन लुईस (१० लाख)
- मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन : जोस बटलर (१० लाख)
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

