Share

आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले रोहित पवार; चंद्रकांत पाटलांना दिलं सणसणीत प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘कुठलाही अनुभव नसताना उद्धव ठाकरेंनी मुलगा आदित्यला कॅबिनेट मंत्री केलं आहे. आता वहिनींना सामनाचं संपादक केलं आहे. त्या खूप चांगलं सांभाळतील असा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढला होता.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधी पक्षाला टोला लगावला आहे. ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, ‘अनुभवापेक्षा आदित्य ठाकरेंनी केलेले काम बघा, एकमेकाची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू शकता असं सांगितले.

तसेच तुमच्या सत्ताकाळात मंत्रिपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या अनुभवावर तर तुम्ही बोलत नाही ना? अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता पाटलांना सुनावले आहे. त्याचबरोबर “भाजपावर आलेले सध्याचे बुरे दिन हे अहंकाराचा फळं आहे,” अशा शब्दांत त्यांनी आशिष शेलार यांना देखील उत्तर दिलं आहे.

दरम्यान, भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५० जिंकू, आहेत त्या ८ जागा टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येतं? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर, विनोदीच आहे सगळं, पालिकेत अबकी बार भाजपा सरकार अशा शब्दात एकाचवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टार्गेट केले आहे.

याचाच धागा पकडत रोहित पवार म्हणाले की, भाजपाचे सुरुवातीला दोनच खासदार होते. आज केंद्रात तुमच्या पक्षासाठी आलेले अच्छे दिन हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातील तुमच्या पक्षासाठी आलेले बुरे दिन हे अशाच अहंकाराचं फळ आहे. असं सांगत आता तरी सुधरा राव असा टोला हाणला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!