Share

तब्बल ३६५ गुन्हे उघडकीस आणणाऱ्या रॉकी या श्वानाचे निधन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Published On: 

बीड : तब्बल ३६५ गुन्हे उघडकीस आणणारा, गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या रॉकी या श्वानाचे काल (शनिवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रॉकी बीड जिल्ह्यातील पोलीस दलात गेले अनेक वर्ष कार्यरत होता. तर, रॉकीच्या निधनानंतर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे.

दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्वाची भूमिका बजावत असते. या श्वानांना तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार केलेले असते, ज्यामुळे ते हजारो नागरिकांचे जीव वाचवण्याचे काम करत असतात. गुन्हा घडताच तपासासाठी देखील या श्वानांचा मोठा हातभार असतो.

शरद पवार पुण्यात, तर अजित दादा बारामतीमध्ये! पवार कुटुंबाची एकत्र भेट होणार?

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, “‘अलविदा रॉकी! आमच्या बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!  दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्वाची भूमिका बजावत असते.”

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आरोपांवर भाजपा प्रवक्ता अवधूत वाघांनी दिले प्रत्युत्तर

तसेच, “महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत. रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील. “अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

रॉकी या श्वानाचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!