Share

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आरोपांवर भाजपा प्रवक्ता अवधूत वाघांनी दिले प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : भाजपा आणि काँग्रेस हे पक्ष सुरुवाती पासूनच विचारधारा वेगवेगळ्या असल्याने विरोधक आहेत.२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडवत भाजपाने देशात पुन्हा सत्ता आणली. अनेक राज्यात देखील भाजपाने जम बसवत, तर काही ठिकाणी आकड्यांचं गणित बसवत सत्ता स्थापन केली. कोरोना काळात देखील अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.

तर, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मात्र थेट फेसबुकवरच एक आरोप लावत आश्चर्यकारक मागणी केली आहे. काही वेळापूर्वीच नितीन राऊत यांनी ट्विट केले आहे. फेसबुक हे भाजपाच्या अनेक मनसुब्यांना खतपाणी घालत असून देशाला व देशाच्या लोकशाहीला घातक ठरत असल्याचा आरोपच त्यांनी फेसबुकवर लावला आहे.

रोहित पवार अपरिपक्व क्रमांक -२? – भाजपा

यावर आता, भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नितीन राऊत यांच्याच पद्धतीने ट्विटरद्वारेच प्रत्युत्तर दिले आहे. ‘ प्रिय काँग्रेस, चीन सोबत असलेले तुमचे संबंध हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला घातक आहेत. कृपया तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या व भारत आणि लोकशाहीच्या संबंधांना घातक असलेल्या चीनचे भागीदारी बनू नका’ , असे ट्विट करत अवधूत वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

निवृत्ती घेतल्यावर धोनी राजकारणात जाणार की इंग्लडकडून खेळणार?

याआधी, नितीन राऊत यांनी, ‘ प्रिय फेसबुक, तुझे भाजपासोबत असलेले संबंध जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला घातक ठरत आहेत. कृपया आपल्या स्वतः च्या व्यवसायात लक्ष घाला आणि भारताच्या लोकशाहीला घातक ठरणाऱ्या भाजपाचे साथीदार होऊ नका ‘, अशी मागणी केली आहे.  त्यामुळे आता हे ट्विट चर्चेचा विषय ठरत असून भाजपावर लोकशाहीस घातक असा गंभीर आरोप देखील लावला आहे.

शरद पवार पुण्यात, तर अजित दादा बारामतीमध्ये! पवार कुटुंबाची एकत्र भेट होणार?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!