Share

मेकअप कितीही चांगला केला तरी खरा चेहरा झाकत नाही, रितेश देशमुखांचा सरकारला टोला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ सुपुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख हे राजकीय मंचावरून सरकारवर जोरदार टोलेबाजी करताना दिसत आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारात रितेश देशमुख चांगलेचं सक्रीय झाले आहेत.

विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. या प्रचारा दरम्यान रितेश देशमुखही स्टेज गाजवत आहे. अशाचं एका सभेत रितेश देशमुख यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘मेकअप कितीही चांगला केला तरी, तो खरा चेहरा झाकू शकत नाही. त्यामुळे भाजप सरकारचा खरा चेहरा जनते समोर आला आहे, असा टोला रितेश देशमुख यांनी लगावला आहे.

रितेश पुढे म्हणाले की, मुंबईत मला माझे मित्र विचारतात की, तुझे भाऊ निवडणूक लढवणार आहेत का? मी त्यांना विचारलं, असं का विचारताय? तर, ते म्हणाले, यावेळी थोडं अवघड वाटतंय. पण, मी त्यांना सांगितलं की मी आणि माझं कुटुंब लातूरचं आहे. संघर्ष करणं आमच्या रक्तात आहे.

तसेच लातूर शहर व ग्रामीण मतदार संघाला प्रचंड मोठा वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा प्रामाणिकपणे पुढे चालविण्याचे काम अमित देशमुख व धीरज देशमुख यांच्याकडून होत आहे. त्याला आपली साथ हवी. लातूरकरासाठी कुठलीही गोष्ट अशक्य आहे असे नाही तर लातूरवासियांना अडचणीत देखील आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची व विजय खेचून आणण्याची सवय आहे, असेही रितेश देशमुख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1180419458017325057?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1180417247447138306?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1180416755245580288?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!