नवी-दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून कोरोना या संसर्गजन्य रोगाने हाहाकार माजवला आहे. ५ महिन्यांपासून काही प्रमाणात रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे चित्र बघायला मिळत होते. तसेच सोमवारी(१६ ऑगस्ट)सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली होती.
मात्र, सर्वात कमी रुग्णांची नोंद झाल्यानंतर पुन्हा एकदा भारतात कोरोना बाधितांमध्ये वाढ झाली आहे. मागील २४ तासांमध्ये तब्बल ३५,१७८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४४० कोरोना बाधितांचे निधन झाले आहे. मंगळवारी(१७ ऑगस्ट)३७,१६९ लोकांनी करोनावर मात केली. त्यामुळे २४३१ रुग्णांमध्ये घट झाली आहे.
India reports 35,178 new #COVID19 cases, 37,169 recoveries and 440 deaths in the last 24 hrs, as per Health Ministry.
Total cases: 3,22,85,857
Total recoveries: 3,14,85,923
Active cases: 3,67,415
Death toll: 4,32,519Total vaccinated: 56,06,52,030 (55,05,075 in last 24 hrs) pic.twitter.com/NttrUIFE74
— ANI (@ANI) August 18, 2021
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात ३५,१७८ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३७,१६९ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले असून ४४० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासून देशात एकूण ३ कोटी २२ लाख ८५ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३२ हजार ५१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ८५ हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी असून एकूण ३ लाख ६७ हजार रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये!
- शर्यतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पडळकरांनी हाकली बैलगाडी, पाहा व्हिडिओ
- ‘राज्यपालांनी स्वतःचा पाय पुन्हा धोतरात गुंतवून घेतला’, संजय राऊतांची टीका
- ‘हिंदू हो तो डर के रहो.. ये है उद्धव का नया महाराष्ट्र!’, नितेश राणेंचा हल्लाबोल
- ‘कोमार्य चाचणी विषय राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमातून वगळावा’, अंनिसचे मंत्री भारती पवारांना निवेदन


