Share

रिषभ पंतने गोलंदाजांना दिले विजयाचे श्रेय म्हणाला…

Published On: 

अबुधाबी :इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यातील 36 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 33 धावांनी मात करत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले आहे. यावेळी त्याने आपली गोलंदाजी युनिट लीगमधील सर्वोत्तम असल्याचं देखील म्हंटल आहे.

दिल्लीच्या गोलंदाजी युनिटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि एनरिक नॉर्जे, भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. या गोलंदाजांना युवा वेगवान गोलंदाज अवेश खानकडून उत्तम साथ मिळत आहे, जो उत्कृष्ट लयमध्ये धावत आहे. 154 धावांच्या लक्ष्याचा बचाव करत संघाने राजस्थानवर 33 धावांनी मोठा विजय नोंदवला.

सामन्यानंतर पंत म्हणाला, ‘आमची गोलंदाजी युनिट सर्वोत्तम नव्हे तर सर्वोत्तमपैकी एक आहे. आम्हाला मात्र एका वेळी एका सामन्याबद्दल विचार करायला आवडेल. आम्ही एक संघ म्हणून फलंदाजांनुसार नियोजन करतो आणि योजनांनुसार गोष्टी करतो. पंतने 24 चेंडूत 24 धावा केल्या आणि श्रेयस अय्यरसोबत 62 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पंत म्हणाला, ‘मला लय मिळवण्यात आनंद आहे. जेव्हा जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा मला आनंद होतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!