मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेक खेळाडू मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.
आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यामुळे कोट्यावधी क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला आहे. मात्र यादरम्यान भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने कसोटी क्रमवारीत पहिल्या १० मध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. यासह रिषभ पंतने इतिहास रचत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत पहिल्या १० मध्ये पोहोचणारा भारताचा पहिला यष्टिरक्षक फलंदाज ठरला.
कसोटी क्रमवारीत रिषभ पंत व्यतिरीक्त कर्णधार विराट कोहली हा ५व्या स्थानी तर रोहित शर्मा हा संयुक्तपणे रिषभ पंत आणि हेन्री निकोलस यांच्यासोबत सहाव्या स्थानी आहे. या तिनही खेळाडूंचे गुण ७४७ आहे. तर क्रमवारीत अव्वल स्थानावर न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा आहे. तर गोलंदाजीच्या क्रमवारीत आर आश्विन हा पहिल्या १० मध्ये असलेला एकमेव खेळाडु आहे. अश्निन हा दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरु केलेला हिंसाचार त्वरित थांबविला पाहिजे’
- एकही सामना न खेळता कोरोनाने गाठले; संदिप वॉरियर साठी दुर्देवी ठरले आयपीएल २०२१
- ‘मराठा समजासाठी काळा दिवस ;अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा’
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता : महाजन
- ‘बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
