Share

साडी नेसल्याने महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे रिचा चड्ढा संतप्त

Published On: 

दिल्ली: सोशल मिडीयावर कोणतीही घटना अगदी क्षणार्धात व्हायरल होतात. सध्या दिल्लीतील रेस्टॉरंटमधील एका हॉटेलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओद्वारे असे समोर येत आहे की, यातील एका महिलेने साडी नेसल्यामुळे तिला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळाला नाही.

भारतीय संस्कृतीत पारंपारीक साडीला खूप महत्व आहे. मात्र साडी नेसल्यामुळे प्रवेश नाकारल्याने याबाबत सध्या सोशल मिडीयावर संताप व्यक्त करत आहे. याबाबत आता अभिनेत्री रिचा चड्ढाने नाराजी व्यक्त केली आहे.

रिचाने ट्विट करत लिहिले की, ‘हे सर्व विनोदी आहे. आपल्याच पारंपरिक कपड्यांची निंदा करणे, स्वत:च्या भाषांकडे तुच्छतेने पाहणे, ही देशावरील परकीयांच्या आक्रमणांमुळे झालेल्या बदलांची लक्षणं आहेत. अशा घटनांमुळे समाजसत्तावादीविरोधी आक्रमक राष्ट्रवादी पंथाची तत्वे जन्माला येतात. साडी हे स्मार्ट आहे, पण तुमची पॉलिसी तितकी स्मार्ट नाही,’ असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून येण्याची परवानगी नाही. कारण भारतीय साडी आता स्मार्ट पोशाख नाही. स्मार्ट पोशाखाची परिभाषा काय आहे कृपया मला सांगावे. जेणेकरून मी साडी नेसणं बंद करेन, ‘ असे या महिलेने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!