मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
आता धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. कालपासून त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. आता हे वृत्तसमोर येताच राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. काल मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. तर, शरद पवार यांनी, ‘हे आरोप गंभीर असून राष्ट्रवादीतील नेत्यांसह चर्चा करून लवकरात लवकर पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल’ असे संकेत दिले आहेत.
या घडामोडी सुरु असतानाच धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. ‘या प्रकरणाबाबत मी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर बाजू मांडली आहे. राजीनाम्याबाबत आदरणीय पवार साहेब व पक्षातील सर्व नेते विचार करून निर्णय घेतील’ असं ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत मुंबई-पुण्यापेक्षा पेट्रोल महाग
- ‘जावयाच्या गुन्ह्यासाठी सासऱ्याला जबाबदार धरणे योग्य नाही’
- धनंजय मुंडेंवर माझा विश्वास – जयंत पाटील
- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर
- बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना होणार आता काश्मीरची ‘राणी’


