Share

धनंजय मुंडेंवर माझा विश्वास – जयंत पाटील

Published On: 

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

आता धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. कालपासून त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. आता हे वृत्तसमोर येताच राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. तर, कालच धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील हे उपस्थित होते.

यानंतर, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. मुंडेंवरील आरोपांवर त्यांना प्रश्न करण्यात आला असता त्यांनी, ‘धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर काहीच बोलणार नाही. मात्र, माझा धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास आहे’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!