🕒 1 min read
मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचंड टीका केली होती. आता चंद्रकांत पाटलांनी अनावधानाने तसा उल्लेख झाला. माझी जीभ घसरली होती. असे स्पष्टीकरण दिले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही. एका कार्यक्रमात अनावधानाने तो उल्लेख झाला. त्या दिवशी एका क्षणापूरती माझी जीभ घसरली होती, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार साहेबांबद्दल मी आदराने बोललेल्या क्लिपचा पेटारा भरेल. मी त्या त्या वेळेस पवारांबद्दल आदराने बोललो ते पण कुठे तरी कोट करा. सांगलीला एक घरगुती कार्यक्रम होता. सार्वजनिक नव्हता. कोणत्याही माणसाची जीभ घसरते. तशीच माझीही एका क्षणापुरती घसरली. तुम्ही क्लिप पाहिली तर लक्षात येईल. हे भाषण केवळ कार्यकर्त्यांना उद्देशून होतं, असे पाटील टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले.
सांगलीत चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण ५४ आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं, कधी ६० वर तो गेला नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
- त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये; नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल
- सर्वात आधी महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या हिंगोलीतच ‘आघाडीत बिघाडी’?
- कश्मिरा शाह, सुनिता आहुजा यांच्यात पुन्हा वाद..?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
