Share

आरक्षणासाठी राजीनामा देणं ही पळवाट – विनायक मेटे

Published On: 

पुणे : आरक्षणासाठी राजीनामा देणं ही पळवाट आहे, उलट सभागृहात राहून प्रश्न सोडवण्यासाठी काम करणं गरजेचं असल्याचं मत शिवसंग्रामचे अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे. पुण्यामध्ये आज मराठा समाजाच्या मागण्यांवर शिवसंग्रामच्या राज्य कार्यकरणीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, उलट शिवसंग्राम संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांच सरकार आल्यानंतर वसतिगृह बांधणे, आण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय याच मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं यावेळी विनायक मेटे यांनी सांगितलं.

आगामी काळात सरकारसोबत रहायची की नाही हा निर्णय भविष्यात घेऊ, हे सरकार मराठांच्या विरोधात असल्याचं अजिबात वाटत नाही. महायुतीममध्ये शिवसंग्रामवरच अन्याय झाला आहे. पण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सरकार सोबत असल्याचंही विनायक मेटे यांनी सांगितले आहे.

मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही- नानासाहेब जावळे

७ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा … सकल मराठा मोर्चाकडून सरकारला अल्टिमेटम

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!