Share

आरक्षण आर्थिक निकषावरचं असावं, जातीय निकषावर नको – राज ठकरे

Published On: 

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा आज पुण्यात पार पडला . या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठकरे यांनी भाषण करताना आरक्षण हे जातीच्या आधारावर न देता,आर्थिक निकषावर द्या, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. मराठा आरक्षणावर पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठा बांधवांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सरकार कोणाचेही असुदेत सरकार फक्त समाजाच्या भावनेशी खेळण्याचं काम करत असत असं त्यांनी म्हंटल आहे.

जातीय आरक्षणाच पाप हे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांच असल्याची टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली. आधीच सरकार असो की आत्ताच हे सर्व लोक मूळ परिस्थिती सांगायला तयार नाहीत, आरक्षण हे शिक्षण आणि सरकारी नौकरीसाठी हवं असत. पुणे शहरात अनेक खासगी शैक्षणिक संस्था आहेत, किती तरी परप्रांतीय मुलं येथे शिक्षण घेतात, मग आमच्या मुलांनी कोठे शिकायचं, असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

आज लहान लहान मूल जातींवर बोलत आहेत, त्यांना कळतही नाही की आपण काय बोलतो ते, आजवर महाराष्ट्राने देशाच प्रबोधन केले आणि आता आपल्यालाच प्रबोधनाची गरज आली आहे. प्रत्येक जातीचा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांसोबत हिंदवी स्वराजासाठी लढत होता. आज ह्याच जाती एकमेकांमध्ये लढत आहेत. त्यामुळे बाहेरचे लोक आपली मजा बघत असल्याच, म्हणत राज ठाकरे यांनी मनातील खंत यावेळी व्यक्त केली.

मनसेच्या राज्य सरचिटणीसपदी किशोर शिंदे यांची नियुक्ती

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!