🕒 1 min read
औरंगाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मागणी केल्या पासून या औषधाची मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी लोक डॉक्टरांच्या पावती विना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाची सर्रास मागणी करत आहे.
कोव्हीड-१९ या संसर्गजन्य महामारीवर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे औषध आता पर्यंत बऱ्याच प्रमाणात लाभदायक ठरल्याची माहिती समोर आल्या नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे या औषधाची मागणी केली होती तसेच अमेरिका, इस्राईल, नेपाळ, भुतानसह इतर देशांमध्ये या औषधाच्या निर्यातीवरून वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान भारताकडे या औषधाचा गरजेपेक्षा तीनपट साठा असल्याचे सरकाने स्पष्ट केले असले तरी हे औषध कोरोनावर पूर्णपणे उपायकारक नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सहमतीशिवाय हे औषध घेऊ नये असं तज्ञांचे मत आहे. तसेच या औषधाचा गरजेपेक्षा जास्त वापर हानीकारक ठरू शकतो असे देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयातील अतिरिक्त सचिव दामू रवी यांनी सांगितल्यानुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन आणि इतर काही औषधांच्या निर्यातीचे मार्ग खुले करावे या इतर देशांच्या मागणीवर सचिवांची समिती व मंत्रिमंडळाने विचार करून देशाची गरज आणि उत्पादनाच्या आधारे निर्यातीमध्ये सूट देण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
