🕒 1 min read
पटना : बिहार निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या कॉंग्रेस पक्षाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षातील 11 आमदार NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा कॉंग्रेस नेते भरतसिंह यांनी केला आहे. यामुळे आता बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेस नेते भरतसिंग म्हणाले की, मदन मोहन झा आता अशोक चौधरीच्या यांच्या रस्त्यानं जात आहेत. कॉंग्रेसच्या 11 आमदारांनी पैसे देऊन तिकीट घेतलं आणि निवडणुका जिंकल्या असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच ते सर्व लवकरच NDA मध्ये सामील होतील असा दावाही त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे विधीमंडळातील कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित शर्मा हेही त्या 11 जणांमध्ये असल्याचं भरत सिंह यांनी सांगितलं आहे. एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा हेही राजीनामा देणाऱ्यांमध्ये आहेत, असा दावा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरकारनं घोषणा केली दहा हजारांच्या मदतीची मात्र शेतकऱ्यांना मिळाले फक्त दोन हजार
- सुझुकी लवकरच आणणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत
- तब्बल 45 वर्षे बिनविरोध असलेल्या बार्शी तालुक्यातील आदर्श मळेगावात यंदा होणार निवडणुका
- ‘दानवेंनी फेकाफेकी करू नये, मी स्वतः संभाजीनगर संदर्भात फडणवीसांना चार पत्र पाठवली होती’
- सुझुकी लवकरच आणणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
