मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनकरित्या वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत ब्रेक दि चेन लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.
यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीपासून ते आरोग्य व्यवस्थेची तयारी, लसीकरण आदी बाबींवर भाष्य केलं आहे. ‘रुग्णांंमध्ये वाढ झाली तर मात्र परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे. सध्या रेमडेसिव्हीरची मागणी वाढली आहे. आपल्याला 50 हजार इंजेक्शनची गरज आहे. केंद्राने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या वाटपाचं नियोजन आपल्याकडे घेतलं आहे. सुरुवातीला केंद्राने 26 हजारच्या आसपास इंजेक्शन मिळतील, अशी व्यवस्था केली होती. नंतर मी मागणी केल्यानंतर आता केंद्राने 43 हजार इंजेक्शन देण्याचे मान्य केले. सध्या 35 हजाराच्या आसपास आपल्याला रोज इंजेक्शन मिळत आहेत.’ अशी माहिती ठाकरेंनी दिली आहे.
यासोबतच, ‘डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर समजलं कि रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे गरज नसताना रेमडिसिव्हर इंजेक्शन देण्याची मागणी करतात. गरज नसताना रेमडेसिव्हीर वापरू नका. गरज नसताना हे इंजेक्शन वापरले तर त्याचे दुष्परिणाम होण्याचे शक्यता टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे गरज असेल तर रेमडेसिव्हीरचा वापर करावा,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- १८ प्लस, उद्या होणार शुभारंभ! मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरणाचा पार पडणार सोहळा
- ‘उद्धवजी, आपण फक्त मुंबईचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात याची ग्वाही मिळेल अशी अपेक्षा करतो’
- लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, नाहीतर ते कोरोना प्रसारक केंद्र होईल – मुख्यमंत्री
- महाराष्ट्रासाठी 12 कोटी डोस एकरकमी घेण्याची तयारी, मात्र पंतप्रधानांनी… – मुख्यमंत्री ठाकरे
- पुण्यासाठी पीएम केअर्स फंडातून मिळाले ३० व्हेंटीलेटर्स; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

