औरंगाबाद : तहसील कार्यालय कन्नड येथे गुरुवार रोजी तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंब यांना मदत म्हणून आयोजित कार्यक्रमामध्ये तालुक्यातील १० कुटुंबातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले.
उभारी २.० अंतर्गत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक विवेचानातून उभारी देण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून आर्थिक मदत करण्यासाठी कन्नड तालुक्यातील ६९ गावातील ११९ कुटुंबांना लाभ मिळावा या माध्यमातून तसेच कोरोना परिस्थितीमुळे समाजाप्रती काही देणे आहे, अशी भावना ठेऊन आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले राजेंद्र पारीख, आकाशदीप कापड दुकान, भरत भारूका, साजन सहेली कापड दुकान यांनी कुटुंबातील वारसांना साडी व मुला /मुलींसाठी ड्रेस कापड तसेच कन्नड तालुका कृषी निविष्टा असोसिएशन मार्फत सन २०१५ ते आजपर्यंतच्या ११९ कुटुंबापैकी प्रातिनिधिक स्वरूपात असोसिएशनचे अध्यक्ष राजू खंडेलवाल, डॉक्टर मधुकर दाबके, सुशील कुमार सोनवणे इत्यादी तर्फे १४ कुटुंबीयातील वारसांना युरियाच्या २ बॅगसाठी ५३० रू रोख स्वरूपात, १०:२६:२६ खत १० किलोची एक बॅग,५ सल्फर खत, किटकनाशक २ बॉटल, बुरशीनाशक १ पॅकेट, ग्रोथ प्रमोटर १ बॉटल, याप्रमाणे किट देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमदार उदयसिंग राजपूत, प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसिलदार संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, नायब तहसिलदार शेख हारून, स्वप्नील खोल्लम, तहसील कार्यालयाचे सत्यजित आव्हाड, व्ही एस अकोलकर जितेंद्र साळुंके, तलाठी विकास वाघ, कृषी विभागाचे जाधव उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा निर्धार; रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

