Share

Reliance Jio चे मुंबईत 5G ट्रायल, इतर शहरांतही लवकरच सुरु होणार ट्रायल

Published On: 

नवी दिल्ली: भारतात 5G नेटवर्कबाबत काम सुरू करण्यात आलं आहे. यासाठी भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियाला 5G चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती. नुकतेच  Airtel 5G नेटवर्कची गुरुग्रामध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे. एका व्हिडीओमध्ये त्याचा 5G स्पीडही दाखवण्यात आला आहे.यात डाउनलोड स्पीड 1Gbps पर्यंत आहे. आता Reliance Jio नेही मुंबईत 5G ट्रायल सुरू केलं आहे.

5G ट्रायलसाठी देशातच डेव्हलप केलेल्या 5G इक्विपमेंट्स आणि टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. त्याशिवाय इतर Samsung, Ericson आणि Nokia सोबत चर्चा सुरू आहे, जेणेकरुन दुसऱ्या शहरांतही येणाऱ्या काळात ट्रायल सुरू केलं जाऊ शकेल. Reliance Jio मिड आणि mmwave बँड्स दोघांचा वापर करुन मुंबईत 5G ट्रायल करत असल्याचे माहिती समोर येत आहे.

5G इक्विपमेंट्सला भारतात लोकल पोर्टनरच्या मदतीने मॅन्युफॅक्चर करण्यात आलं आहे. साईट डिप्लोएड प्रकरणात Jio चं 5G ट्रायल अतिशय मोठं आहे. दिल्ली, मुंबई, गुजरात आणि हैदराबादमध्ये Jio ने ट्रायलसाठी अप्लाय केलं आहे. डिपोर्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने नुकतंच 5G ट्रायलसाठी 700MHz, 3.5 GHz आणि 26GHz बँड्स स्पेक्ट्रम Airtel, Reliance Jio आणि Voddafone Idea साठी उपलब्ध करुन दिलं होतं.

येत्या काही महिन्यात एअरटेलच्या 5G नेटवर्कची चाचणी अन्य ठिकाणी हीहोण्याची शक्यता आहे. सध्या भारतात यावर वेगाने प्रयत्न केले जात आहेत. Airtel ला दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये 5G ट्रायलसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. याबाबत एअरटेल क्वॉलकॉममध्ये करार करण्यात आला आहे. एअरटेल क्वॉलकॉमच्या मदतीने भारतात ५ जी सर्विस सुरू करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!