Share

‘नात्यांचे संदर्भ बदलतच असतात, अगोदर ‘जी’ चेटकीण वाटायची आज ती प्रेयसी झालीये’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे उर्जामंत्री तथा काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहे. काँग्रेस सतत महागाईवरून केंद्र सरकारवर टीका करीत आहे. यावरूनच त्यांनी पुन्हा एकदा महागाईविरोधात मोदींना खोचक टोला लगावला आहे.

२०१४ साली ज्या मोदी सरकारला अर्थातच भाजपला तथाकथित महागाई चेटकीण वाटत होती, ती आता त्यांची प्रेयसी झाली आहे. असा विरोधात्मक टोला त्यांनी ट्वीट करत लगावला आहे. त्यामुळे भक्तांमध्ये नात्यांचे संदर्भ बदलत असतात. काल जी चेटकीण होती आज त्यांच्यावरच भाजपचं प्रेम जडलं असल्याचं राऊत यांनी म्हटले आहे.

महागाईवरून काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर सतत केंद्राचा विरोध केला आहे. ‘अच्छे दिन’ चा भ्रम असल्याचा काँग्रेसने देशवासियांना सतत पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. याविरोधात काँग्रेस तसेच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वात आंदोलन केले आहे. त्यामुळे महागाई ही जणू काय केंद्र सरकारची प्रेयसी बनली असल्याचे काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!