Share

‘बिग बॉस’मध्ये रेखाची दमदार हजेरी; महत्त्वाची जबाबदारी देण्याची शक्यता

Published On: 

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’१५ शोची प्रचंड चर्चा होत आहे. यातच आता करण जोहरचा  ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा हजेरी लावणार आहे. या यामुळे या शोची रंगत वाढणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ शो सहा आठवडे चालणार आहे.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये रेखा यांना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ साठी आता पाच आठवडे शिल्लक आहेत. यानंतर, सलमान खानचा शो ‘बिग बॉस 15’ सुरू होताच धमाल करणार आहे.

रेखा पहिल्याच दिवशी विशेष जबाबदारी पार पडणार असल्याचे म्हंटले जात आहे. ‘बिग बॉस १५’ मध्ये सलमान खानसोबत बिग बॉस ओटीटी मधील स्पर्धकांची ओळख करून देण्याचं महत्त्वाचं काम रेखा पाडणार आहेत. सध्या त्यांच्या येण्याने चाहता वर्ग देखील खुश झाला आहे.

बिग बॉस ओटीटी ८ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. हा शो आधी ‘वूट’वर दिसणार आणि मग टीव्हीवर रिलीज होणार आहे. त्याच्या सहा आठवड्यानंतर १५ ऑक्टोंबरपासून हे एपिसोड्स टीव्हीवर दिसणार आहेत. त्यामूळे चाहत्यांना त्यांच्या वेळेनुसार हे  एपिसोड्स पाहता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!