Share

ब्रेकिंग : राज्यपालांच्या भेटी संदर्भात सुधीर मुंनगंटीवारांचे मोठे विधान, म्हणाले…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपालांची भेट घेत असलो तरी आज सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी दिले आहे. सुधीर मुंनगंटीवार हे आज मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, आम्ही सुरवाती पासून आतापर्यंत शिवसेने सोबतचं सरकार बनवण्यास आग्रही आहोत. त्यामुळे भाजप काहीही झाल तरी अल्पमतातील सरकार बनवणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीस हे देखील एक शिवसैनिक आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने शिवसैनिकचं मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे मोठे भाऊ आहेत. तर उद्धव ठाकरे मार्गदर्शक आहेत, असेही मुंनगंटीवार म्हणाले.

आम्ही घोडाबाजार करणार नाही शिवसेनेचे आमदार वगैरे आम्ही फोडणार नाही. मुळात म्हणजे शिवसेनेचे आमदार हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित आहेत. त्यामुळे ते फुटणार नाहीत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्षात बसण्याची तयारी दाखवत आहेत. त्यामुळे पाठींबा वगैरे देऊन सरकार स्थापन करणार नाहीत, असे मुंनगंटीवार म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यामध्ये कोणतीही बैठक झाली नाही. ही केवळ अफवा आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणात लक्ष घालत नाही. कोण मुख्यमंत्री कोण मंत्री याचा त्यांना फरक पडत नाही. संघाला सर्व काही समान आहेत. भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे कलम ३७० हटवण्याला पाठींबा देणार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त्ये हे देखील संघाला जवळचे आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!