Share

३० टक्के शैक्षणिक शुल्क कमी करा; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अभाविपचे निवेदन

Published On: 

करोना पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील विविध शाखांचे प्रवेश शुल्क 30 टक्के कमी करावे, व उर्वरित शुल्क चार टप्प्यात घ्यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

१ ऑगस्ट पासून विविध विद्यालयात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयातून घ्यावी लागतात मात्र लॉकडाऊन मुळे कागदपत्रे जमा करण्यास अडचणी येत आहेत. शुल्क न भरल्यामुळे कोणत्याही महाविद्यालयात अथवा शालेय विद्यार्थी ऑनलाइन चालू असलेल्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

प्रवेश शुल्काच्या बाबतीत या मागण्यांचा विचार करून माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांनी महाविद्यालयांना सूचना द्याव्यात अशी त्यांना या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली. अभाविप महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने शुल्क नियामक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. गिलानी यांना निवेदनाद्वारे मागण्या मांडल्या आहेत.

परिणामी, प्रवेश प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असल्याचेही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मांडले आहे. यावेळी मालेगाव शहर संघटक सचिन लांबुटे, शहर मंत्री कामेश गायकवाड, शुभम लोंढे, गोकुळ बच्छाव, कुणाल भदाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य पोलिस तक्रार प्राधीकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली नियुक्ती का?

विज बिल ग्राहकांना न्याय देणारा निर्णय घ्या, आमदार किशोर जोरगेवार यांची अजितदादांकडे मागणी

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शरद पवारांनी व्यक्त केली ‘हि’ प्रतिक्रिया

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!