मुंबई : मागील महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने ह्या आठवड्यात चांगलाच जोर लावलेला पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काल रात्री ११ वाजेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर पहाटे ४ वाजेनंतर कमी झाला.
दरम्यान आता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी येत्या २४ तासांसाठी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी हा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागामार्फत देणय्ता आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी १९ जुलै ते २२ जुलै या कालावधीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आहे.
तर आज सायंकाळी याच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज सायंकाळी 6 वाजता होणार असून या बैठकीत मुसळधार पावसामुळे मुंबईत उद्भवलेल्या आपत्तीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.
दरम्यान मुंबईत काल रात्री ११ ते पहाटे ४ या साधारणपणे ५ तासांच्या कालावधी दरम्यान अनेक ठिकाणी तब्बल २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यानुसार सर्वाधिक म्हणजे २२६.८२ मिलिमीटर इतका पाऊस हा ‘आर उत्तर’ विभाग क्षेत्रातील दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत’, काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा
- ‘पटोलेंच्या बोलण्याने महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही’, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
- आठवले दोन दिवसांत पलटले! शिवसेनेला म्हटले भाजपसोबत या, अन् आज केले राष्ट्रवादीला आवाहन
- ‘..तर मग भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र का येऊ शकत नाहीत?’, आठवलेंचा नवाब मलिकांना प्रतिप्रश्न
- ‘पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आलीये!’, आठवलेंनी दिले राज्यात सत्ता स्थापनेचे निमंत्रण


