Share

दिलासादायक : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट सुरूच; मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले

Published On: 

पुणे – राज्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत काल पुन्हा घट होऊन ती 1 लाख 35 हजारावर आली असली तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाणही घटून दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर प्रथमच ते 2 टक्क्यांपेक्षा कमी झालं आहे. नवबाधितांची संख्याही काल पुन्हा एकदा 3 हजाराच्या खाली गेली. काल राज्यात 2 हजार 583 नवे कोरोनाबाधित आढळले. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण 1.90 टक्के होतं.

राज्यात काल बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या नवबाधितांपेक्षा जास्त, 3 हजार 836 इतकी होती. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून 41 हजार 372 वर आली. काल राज्यात या आजाराने 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. पुणे, अहमदनगर, मुंबई, सोलापुर आणि साताऱ्यात अजूनही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असली तरी काल या जिल्ह्यातली रुग्णवाढही घटली आहे. वर्ध्यातला 1 मृत्यू वगळता काल विदर्भ आणि मराठवाड्यात कुठेही कोविड मृत्यूची नोंद झाली नाही.

दरम्यान, राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या, आता 2 कोटींच्या पुढे गेली असून, या बाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत, राज्यात दुसरी मात्रा मिळालेल्यांची संख्या, 2 कोटी 6 लाख 73 हजार 908 झाली होती. पहिली मात्रा देण्यात मात्र, उत्तर प्रदेश महाराष्ट्रापेक्षा पुढे आहे. महाराष्ट्रात 5 कोटी 27 लाख 66 हजार 279, तर उत्तर प्रदेशात, 7 कोटी 75 लाख 46 हजार 189 जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे.
त्यामुळे एकंदर लसीकरणात महाराष्ट्राला मागे  टाकणाऱ्या उत्तर प्रदेशानं आपली आघाडी कायम राखली आहे.

उत्तर प्रदेशात पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकंदर 9 कोटी 42 लाख 9 हजार 219 मात्रा देण्यात आल्या महाराष्ट्रात देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रांची मिळून एकंदर संख्या 7 कोटी 34 लाख 40 हजार 187 आहे. देशभरात आतापर्यंत लसीच्या दोन्ही मिळून एकंदर 81 कोटी 73 लाख 95 हजार 763 मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान लसीकरणानंतरही कोरोनाची बाधा झाली तरी ती कमी घातक असते असं आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेली आकडेवारी सांगते. ज्यांनी लस घेतलेली नाही अशा कोविड रुग्णांच्या तुलनेत पहिली मात्रा घेतलेल्या रुग्णांमधला मृत्यूदर साडे शहाण्णऊ तर दुसरी मात्रा घेतलेल्या कोविड रुग्णांमधला मृत्यूदर साडे सत्त्याण्णव टक्क्यांनी कमी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!