🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ झालेली नव्हती. मात्र आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत आज पेट्रोल 58 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 79.49 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 58 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.37 रुपयांवर गेला आहे.
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 60 पैशांनी तर डिझेलचे दर 60 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 72.46 रुपये आणि 70.59 रुपये मोजावे लागतील. गेल्या 80 दिवसांत पहिल्यांदा रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा महाग झाले आहे.
राज्यात आजपासून पुन:श्च हरी ओम !, वाचा काय होणार सुरु…
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलची मागणीत सुधारणा होत आहे. याच दरम्यान कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 40 डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान जवळपास गेल्या 80 दिवसांत तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केला नाही. 16 मार्च रोजी इंधनाच्या किंमतीत बदल झाला होता. त्यानंतर रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली.
स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं, सोनू सूदचं मराठीमध्ये ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
