Share

आरोग्यम् धनसंपदा : केसगळती कारणे आणि उपाय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- केसांचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले.

केस गळतीची कारणे
जर तुमच्या घराण्यात केसांची लांबी आखूड किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे तर ही समस्या पुढच्या पिढीकडेदेखील जाण्याची शक्यता असते. हार्मोन्समध्ये बदल होणे- पॉलिसिस्टिक ओवेरी सिंड्रोम, गरोदरपण, मेनोपॉज या काळात हार्मोन्समध्ये बदल होत असतो. शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यास केसांची वाढ थांबते. त्यामुळे याचा परिणाम केसांवर होऊन केस गळू लागतात.
शरीरात झिंक, बायोटिन, प्रोटीन ही पोषकतत्व कमी असल्यास केसांची मुळे कमजोर होऊन केसांची गळती होऊ लागते.

केस गळतीवर उपाय 

१) कांद्याचा रस- कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.गरम पाण्यात कांद्याचा रस मिसळून लावल्यासही फायदेशीर असते. यामुळे केस घनदाट होतात.
२ ) बदामाच्या तेलातही अनेक पोषणतत्वे असतात. बदामाच्या तेलात कांद्याचा रस मिसळून लावल्यास केसगळतीची समस्या दूर होते. तसेच केस दाट, मुलायम आणि चमकदार बनतात. तुम्ही बदामाच्या तेलाऐवजी नारळाचे तेलही वापरु शकता.
३) कढीपत्त्यात असलेले अॅमनो अॅसिड आणि अँण्टी ऑक्सिडेंट्स केस मजबूत बनविण्यासाठी फायदेशीर असतात.
४) जास्वंद केसांना पोषण देतात,केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!