🕒 1 min read
नवी दिल्ली : रियलमीने नुकताच भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme C11 लाँच केला आहे. २२ जुलै रोजी या फोनचा पहिला सेर आयोजित करण्यात आला होता. ७ हजार ४९९ रुपये किंमत असलेल्या या फोनला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या काही मिनिटात या फोनची १.५ लाख विक्री झाली आहे. असे रियलमी कंपनीने ट्विट करून माहिती दिली आहे.
या स्मार्टफोनचा सेल दुपारी १२ वाजता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाची वेबसाइटवर सुरू झाला होता. अवघ्या काही मिनिटात १.५ लाख फोनची विक्री झाली. ही आकडेवारी कंपनीने एका ट्विटद्वारे दिली आहे. आता या फोनचा पुढचा सेल २९ जुलै रोजी होणार आहे.
Do you recall any bigger sale at any day than this in 2020? Another #DareToLeap record made by realme's entry-level value king.
1,50,000+ users have chosen to upgrade to a #BiggerBatteryLargerDisplay with #realmeC11 today. pic.twitter.com/fgXXj11rT2— realme (@realmeIndia) July 22, 2020
हि आहेत फोनची खास वैशिष्ट्ये : या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच आहे. फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. या फोनमध्ये युजर्संना मोठा डिस्प्ले आणि मोठी बॅटरी मिळते. रियलमी सी ११ मध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. फोनला पॉवर देण्यासाठी मीडीयाटेक हीलियो G35 प्रोसेसर दिला आहे. यात 5000mAh बॅटरी दिली आहे. रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
रियलमी C11मध्ये फोटोग्राफीसाठी दोन रियर आणि एक फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनच्या मागे १३ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. यात दोन सीमकार्ड सोबत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येतो. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर नसला तरी फेस अनलॉकचे फीचर देण्यात आले आहे.
लॉकडाउनच्या काळात भारतीयांची सर्वाधिक पसंती ‘या’ पदार्थाला
मास्क वापरा हा संदेश देण्यासाठी मार्क झुकरबर्ग यांनी ठेवला खास फोटो
किमान ५० गुणांचा संविधान अभ्यासक्रम अनिवार्य करा; राज्यातील विचारवंतांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
