Share

किमान ५० गुणांचा संविधान अभ्यासक्रम अनिवार्य करा; राज्यातील विचारवंतांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा, देशभक्तीचा वारसा लाभलेला, अनेक थोर विचारवंतांचा म्हणून ओळखला जातो. आता राज्यातील अनेक विचारवंतांनी एकत्र येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात संविधानातील मुल्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

भाषतज्ज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, शाहीर संभाजी भग, राम पुनियानी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मागणीला महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. या पत्रात बारावीच्या परीक्षांसाठी किमान 50 गुणांचा संविधान अभ्यासक्रम अनिवार्य करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

श्रावणात तरी मंदिरं खुली करा, शिवसेना नेते चांद्रकांत खैरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

या निवेदनात ते म्हणतात, “आपल्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचं महाराष्ट्रातील जनतेनं खूप विश्वासानं आणि अपेक्षा ठेवून स्वागत केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकराजा शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा सामाजिक परिवर्तनाचा वारसा सांगत हे सरकार सत्तेवर आलं आहे. या महान व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचे सार आपल्या भारतीय संविधानात उतरलेले आहे. ज्या संविधानाच्या आधारे आपल्याला आपला भारत घडवायचा आहे ते संविधान नागरिकांनी समजून घेणे फार आवश्यक आहे.”

भरती आणि पदोन्नतीतील मागासवर्गीयांच्या संविधानिक अधिकारांची जपणूक व्हावी – नाना पटोले

सद्याच्या काळात असलेली नीतिमत्ता लक्षात घेता, “शालेय वयातील विद्यार्थ्यांना पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्वाच्या तरतुदी शिकवणे शक्य आहे. हे काम प्रभावीपणे होण्यासाठी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने संविधानिक मुल्यांबाबत शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखावा.”

शरद पवारांच्या पायाला पुन्हा भिंगरी, सोलापूर नंतर ८० वर्षाचा योद्धा नाशिकच्या दौऱ्यावर…

तसेच, “विविध विभागात शिक्षकांची संविधान साक्षरता शिबीरं आयोजित करावीत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सर्व माध्यमातील बारावीच्या परीक्षांसाठी त्या त्या भाषेमधून येत्या शैक्षणिक वर्षांपासून किमान 50 गुणांसाठी संविधान मूल्यजागृती अभ्यासक्रम अनिवार्य करावा,” अशी मागणी या विचारवंतांनी केली आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे.

यासोबतच, महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी संघटनांनी राज्यव्यापी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक घेत संविधान मुल्यांवरील अभ्यासक्रमाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. यात एनएसयूाय (NSUI), राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस, छात्र भारती, युक्रांद, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, स्वाभिमानी विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र स्टुडन्ट युनियन, भारतीय विद्यार्थी मोर्चा, इस्लामिक स्टुडन्ट युनियन, युवा संघर्ष समिती, महाराष्ट्र स्टूडन्ट वेलफेअर असोसिएशन या विद्यार्थी संघटनांचा समावेश आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!